- राजुरा तालुक्याचे सुपुत्र कु. अमन करमनकर यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय नेट बॉल स्पर्धेत निवड
जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब – अमन करमनकर
राजुरा – 17 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनिअर नेट बॉल स्पर्धेत चंद्रपूर संघात 12 सदस्यांची निवड करण्यात आली असून ते यावर्षी 27 ते 29 एप्रिल दरम्यान पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनिअर नेट बॉल स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
सदर खेळाडू पुणे, महाराष्ट्र येथे चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप जयस्वाल, उपाध्यक्ष श्री.सुनील दाखोले, श्री. प्रदीप देशमुख, सचिव श्री. निखिल पोटदुखे जी, सहसचिव प्रा. विकी पेटकर जी, सदस्य रितेश जी पाटील, श्री.सुदर्शन जी निमकर माजी आमदार, सौ.भारती ताई पाल (सरपंच बामणवाडा), श्री. आनंद भाऊ नगराळे (पोलिस पाटील बामणवाडा), बाळ भाऊ वडस्कर (सरपंच चुनाळा), श्री .अंकुशजी परेकर (तालुका उपाध्यक्ष राजुरा तालुका काँग्रेस), श्री.आक्रोशजी जुलमे अध्यक्ष मिलींद संजोग मंडळ, श्री.धर्मुजी नगराळे (भा.बौ.म राजुरा) श्री .आशीष जी करमनकर (अध्यक्ष छावा फाऊंडेशन) मा.चैतन्य करमनकर जी (सचिव काँग्रेस कमिटी बामणवाडा) तसेच बामणवाडा व चुनाळा ग्रामस्थांनी आणि मित्र परिवार यांनी निवड झालेल्या खेळाडूचे अभिनंदन केले आहे.
कारण अशी म्हण आहे आज ही संघर्ष आहे कारण संघर्ष त्यालाच निवडतो त्याला संघर्षाला समोर जाण्याची ताकद असते आणि तो संघर्षाला समोर जाऊन ते यश मिळवतो – अमन करमनकर (राष्ट्रीय खेळाडू )