चंद्रपुर जिल्हातील सुगंधीत तंबाकु तस्कर जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह तसेच अवैधरित्या दारू वाहतुक करणारे यांचेवर गुन्हा दाखल….
चंद्रपुर: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्या अनुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक २९/०४/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन पोलीस स्टेशन, मुल हद्दीतील मौजा राजगड फाटा ता. मुल, जि. चंद्रपुर येथुन एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ मध्ये अवैधरित्या दारूचा साठ वाहतुक करून गडचिरोली जिल्हयामध्ये जात आहे अशा खबरे वरून मौजा राजगड फाटा येथे नाकेबंदी करून नमुद वाहनाला थांबवुन त्यामध्ये गाडीचा चालक नामे १) आदिल पठाण, रा. दसरा चौक, सिंदेवाही, जि. चंद्रपुर, व त्याचे सहकारी नाव २) पलाश बांबोळे, रा. राम मंदिर जवळ, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ३० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग रॉकेत संत्रा ९० एम. एल. देशी दारूनी भरलेली असे एकुण ३,००० नग प्रत्येकी नग ३५/- रू. प्रमाणे १,०५,०००/- रूपये चा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,०५,०००/- रूपये असे जप्त करून आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, मुल यांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच दिनांक २९/०४/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी.एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारपुस केली असता त्यांनी नामे जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले.
वरील दोन्ही कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकुण १०,१९,२२०/- रूपयाचा माल जप्त केला
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे