चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसचे गौवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई

58

चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसचे गौवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई

गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

गढचांदूर : चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना दिले त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंदपुर यानी विविध पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक ०१/०५/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन पोलीस स्टेशन, गडचांदुर परिसरातील मौजा हिरापुर, ता. गडचांदुर येथील नामे अब्दुल अजीज अब्दुल रा. गडचांदुर हा आपला भाउ नामे अब्दुल अनीस रा. गडचांदुर यावे शेतात गाई-बैल (गोवंश) गोळा करून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात कोंबुन अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करून तेलंगना राज्यात नेणार आहेत अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथिल पथकाने मौजा हिरापुर शेतशिवारात धाड मारून पाहणी केली असता सदर शेत शिवारामध्ये आयचर ट्रक, अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक, टाटा कपंनीचा पिकअप असे एकुण सात वाहने थांबुन दिसली सदर वाहनांची पाहणी केली असता, सदर पाहणामध्ये अवैधरितया जानावराना कुरतेने हात, पाय, तोंड बाधुन चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना आखुड दोराने कचकचुन दाटीने भरून त्यांची कत्तरी करीता वाहतुक करण्याकरीता अपप्रेरीत करून डांबुन भरून अवैधरित्या वाहतुक करून तेलंगना राज्यात घेवुन जाण्याचे समजले. सदर सात वाहना मधील एकुण १५० जनावरे व वाहने किमंत एकुण १,३०,००,०००/- रू. (एक कोटी तिस लाख रूपये) चा माल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील एकुण १५ आरोपीतांना घटनास्थळावरून ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन, गडचांदुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ताब्यातील आरोपीतांना पुढील तपासा कामी पोस्टे गडचांदुर यांचे ताब्यात देण्यात आले तसेच वाहनांमधील गोवंशाना नगरपालिका राजुरा कोंडवाडयात जमा करण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पो,उपनि विनोद भुरले, पोहवा धनराज, पोहवा स्वामीदास, पोहवा अजय, पोहवा प्रकाश,पोहवा नागरे, पोहवा नितीन, पोहवा सुभाष, पोहवा सतिश, पोहवा किशोर, पोहवा रजनिकांत, चापोहवा दिनेश, नापोशि संतोष, पोशि/सावे, पोशि/प्रशांत, पोशि मिलींद स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ने गौवंश तश्करीवर कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here