छत्रपती शाहू महाराज स्मुर्ती दिना निमित्त विनम्र अभिवादन
आज दिनांक 6 मे 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस व यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 102 स्मुर्ती दिना निमित्त अभिवादन करण्यात आला.
तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे
यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर
तर आभार प्रदर्शन पिंकीताई तामगाडगे यांनी केले
यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, पुनमताई कांबळे, शोभाबाई पाईकराव, पिंकीताई तामगाडगे, भारतीताई सोदारी, ईशा भगत, आयुषी निखाडे, व समस्त बौद्ध बांधव आदी उपस्थित होते.