स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची शहरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई

39

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची शहरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई

कारवाईमध्ये 5,70,400/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

चंद्रपुर: पोलीस अधिक्षक सुदर्शन मुम्मका चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरयांना दिले होते त्या अनुषंगाने पो.नि महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी एक पथक नेमुण अवैध धंधावर कारवाई करण्याचे निर्देश दिले
दिनांक 11/05/2024 रोजी गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, जटपुरा गेट कडुन कौस्तुरबा चौक,चंद्रपूर कडे जाणाऱ्या रोडने एका मारोती स्वीफ्ट कार क्र MH 40 A 7877 गाडीच्या डिकी मध्ये सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार नावाचा इसम हा चुगडया मध्ये सुगंधित तंबाखु बाळगुण अवैध रीत्या विक्री करीता येत आहे.अशा खबरेवरून जटपुरा गेट कडुन कौस्तुबा चौक, चंद्रपूर कडे येणाऱ्या दुदलवार हॉस्पीटल समोरील रोडवर नाकेबंदी केली असता एक चार चाकी कार संशायापसद स्थीतीत जटपुरा गेट कडुन कौस्तुरबा चौक चंद्रपूर कडे येताना दिसली सदर कार जवळ येताच त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार रा. चव्हान फॅक्ट्री जवळ जलनगर चंद्रपुर ने चारचाकी वाहन क्र MH 40 A 7877 हे रोडचे बाजुला सोडुन पोलीसांना बघताच पडुन गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनासह ईगंल हुक्का शिशा सुंगंधीत तंबाखु एकुण कि. 5,70,400/- रू. किमतीचा मुददेमाल मिळुन आला. सदर चा गुन्हा पोस्टे चंद्रपूर शहर येथे नोंद करून मुद्देमाल पोस्टे चंद्रपूर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक,रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, अमोल सावे चापोहवा दिनेश अराडेयांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here