घुग्घुस शहरात मान्सूनपूर्व नाली सफाई करा- विवेक बोढे
घुग्घुस शहरात मान्सूनपूर्व नाली सफाई करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्या ही ५० हजारांच्या जवळपास आहे. घुग्घुस शहरातील अनेक वार्डात पावसाळ्यात नाली जाम होऊन नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते त्यामुळे घरातील साहित्य खराब होऊन नुकसान होते.
अशा अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची भेट घेतली व निवेदन देऊन मागणी केली. याप्रसंगी न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच नाली सफाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, रवी बडगुलवार आदींची उपस्थिती होती.