नागरिकांना घर बांधकामासाठी शासकीय रेती घाट डेपो तातळीने शुरु करा : राजुरेड्डी
घुग्घुस : जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या शहरातील नागरिकांना घर बांधकाम करणे,दुरुस्ती करणे,शौचालय बांधकाम करणे आदी कामासाठी रेती ( वाळू) ची आवश्यकता असते मात्र आता पर्यंत शासकीय रेती डेपो शुरु न झाल्याने नागरिक बांधकामा पासून वंचित राहत असून काही नागरिकांना नाईलाजाने रेती तस्करा कडून महागडी रेती चढत्या दराने घ्यावी लागत आहे
यामुळे शासनाला कराचा तर नागरिकांना अधिक रकमेचा चुना लागत आहे.
तसेच वाममार्गाने घेतलेली रेती शासनाने जप्ती करण्याची ही भीती असते नागरिकांना घर निर्माण करण्यासाठी तातळीने शासकीय रेती पावसाळा शुरु होण्या आधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी घुग्घुस काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन केली आहे