- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
यवतमाळ जिल्हा कमिटी तर्फे चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघातील जनतेचे हार्दिक अभिनंदन व आभार !!
यवतमाल:
संविधानाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय जनतेने केलेल्या कामगिरीत यवतमाळ जिल्ह्यातील जनतेचे मोठे योगदान असल्याचे आजच्या लोकसभा निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्ट, अनैतिक, जनविरोधी, धर्मांध व हुकूमशाही राजकारणाला सणसणीत चपराक लगावली आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने देशभरात सर्वत्र लोकशाही संस्था मोडीत काढत हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न चालवला होता. तो यशस्वी करण्यासाठी नरेंद्र मोदी-अमित शहा-देवेंद्र फडणवीस यांनी काळा पैसा आणि दहशत यांच्या जोरावर हुकूमशाही राबवण्यासाठी महाराष्ट्र ही प्रयोगशाळा बनवली होती. दोन्ही मुख्य विरोधी पक्षांना त्याने प्रलोभने व धमक्यांच्या जोरावर फोडले होते. भाजपच्या या अनैतिक राजकारणाला चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने ठाम नकार दिला आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी भाजपच्या मनुवादी, हुकूमशाही राजकारणाला स्पष्ट नकार देत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीस मोठे यश दिले याबद्दल त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची यवतमाळ जिल्हा कमिटी हार्दिक अभिनंदन करत आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने स्वखर्चाने तन, मन, धनाने परिश्रम घेऊन कुठे पायदळ, कुठे सायकलने तर कुठे दोन चाकी किंवा चार चाकी वाहनाने प्रचार केला. त्याबद्दल जिल्हा कमिटी त्या सर्व कार्यकर्त्यांचे ही अभिनंदन व आभार व्यक्त करते!
या लोकसभा निवडणुकीचे प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीतही पडल्याशिवाय राहणार नाही.
*कॉ. कुमार मोहरमपुरी*
यवतमाळ जिल्हा सचिव, माकप
*कॉ. दिलीप परचाके*
राज्य कमिटी सदस्य, किसान सभा *कॉ. डी. बी. नाईक* जिल्हा कमिटी सदस्य, माकप *कॉ. देविदास मोहकर* जिल्हा अध्यक्ष, किसान सभा *कॉ. चंद्रशेखर सिडाम* जिल्हा सचिव, किसान सभा *कॉ. मनोज काळे* जिल्हा उपाध्यक्ष, किसान सभा *कॉ. कवडू चांदेकर* जिल्हा कमिटी सदस्य, माकप *कॉ. सदाशिव आत्राम* जिल्हा कमिटी सदस्य, माकप *कॉ. मनीष इसालकर,
कॉ. निरंजन गोंधळेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे* , *कॉ. अनिता खुनकर* जिल्हा कमिटी सदस्य, माकप *कॉ. उषा मुरखे* जिल्हा सचिव, आशा संघटना, सिटू *कॉ.प्रीति करमरकर* जिल्हा कमिटी सदस्य, आशा संघटना, सिटू