घुग्घुस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी
बकरी ईद हा सण शांती आणि त्यागाचे प्रतीक- विवेक बोढे
घुग्घुस: शहरात सोमवार १७ जून रोजी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जामा मशीद येथे नमाज संपल्यानंतर भाजपा नेत्यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद-उल-अजहा मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण मानला जातो. शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो या शुभेच्छांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांसोबत मोठ्या आनंदाने बकरी ईद साजरी केली.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, साजन गोहणे, सिनु रामटेके, प्रवीण सोदारी, असगर खान, मोनीन शेख, शफी शेख, उमेश दडमल आदी भाजप पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.