महावितरण कंपनीच्या कामगाराच्या “धोरनाला घेतलं हातीसी ,आदिवासी टायगर सेना पाठीशी”
पोलिस अधीक्षक चंद्रपूर ह्यांना भेटून घेतली झालेल्या कार्यवाहीची माहीती
घुग्घुस येथील महावितरण कंपनीच्या च्या तांञिक कर्मचारी सूरज परचाके ह्यांना कर्तव्यावर असताना नकोडा येथील सरपंच ह्यांनी सूरज परचाके ह्याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची बातमी माहिती होताच आदिवासी टायगर सेना चे पदाधिकारी थेट पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लावले गेले ह्याची धारेवर धरून माहिती घेतली. त्या नंतर पोलिस अधीक्षक चंद्रपूर ह्यांना भेटून पिढीत कर्मचारी हा अनुसूचित जमाती चा असल्याने आरोपींवर ॲक्टोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली.सदर प्रकरणात आदिवासी टायगर सेना ही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहील असे मत ऍड संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, ऍड जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष,दिनेश परतेती तालुका अध्यक्ष चंद्रपूर, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा युवा महासचिव, शेखर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष युवा, बाळु कुळमेथे जिल्हा सदस्य सह शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशन व पिढीत कर्मचाऱ्याला भेटून देण्यात आली.