वेकोली सुरक्षा रक्षक मद्यधुंद अवस्थेत खंजर घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड ?
पत्रकाराच्या जागरूकतेने अनर्थ टळळा!
घुग्घूस : शहरात हाजी बाबा शेख यांच्या हत्येमुळे सर्वत्र तनावाची परिस्थिती असतांना वेकोलीच्या न्यू रेल्वे सायडींगवर बादल पिंपळशेंडे हा सुरक्षा रक्षक मद्यधुंद अवस्थेत खंजर घेऊन फिरत होता.
सदर घटना पत्रकार नौशाद शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर सुरक्षा रक्षकाकडून खंजर हिसकावून घेत सदर घटनेची माहिती वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना दिली
मात्र अजून पर्यंत पोलिसांनी सदर सुरक्षा रक्षकाला अटक केलेली नाही.
वेकोली सुरक्षा अधिकारी श्रीनिवास रेवाल्ली यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे.
याप्रकरणी सुरक्षा रक्षक पिंपळशेंडे हा आत्मरक्षे करीता आपण खंजर वापरत असल्याचे सांगत आहे.
याप्रकरणी घुग्घूस पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के काय भूमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागलेले आहे