घुग्घुस शहरातील वेकोलीच्या मोठ्या तलावचे खोलीकरण करा – विवेक बोढे
घुग्घुस : शहरातील वेकोलीच्या मोठ्या तलावाचे खोलीकरण करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी निवेदनातून केली आहे.
हा तलाव वेकोली व घुग्घुस शहरासाठी पाण्याचा मोठा स्रोत आहे. अगोदर कोळी समाज बांधव या तलावत मोठ्या प्रमाणावर मासेमारी करायचे परंतु पाणी घाण असल्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. कोळी समाज बांधवासमोर उपजिविकेची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, चिन्नाजी नलभोगा, अमोल थेरे, शिवसेना शहरप्रमुख महेश डोंगे, हसन शेख, बबलू सातपुते, इर्शाद कुरेशी, प्रवीण सोदारी, शाम आगदारी,सुशील डांगे,अमोल नागपुरे, दिपक कामतवार व कार्यकर्ते उपस्थित होते.