Breaking Newsक्राईमचंद्रपूर चंद्रपुर एन डी हाटेलच्या आत जुगार खेळणारे आरोपी राम नगर पोलीसच्या ताब्यात By khabron ka safar - September 3, 2024 23 Share FacebookWhatsAppTwitter चंद्रपुर एन डी हाटेलच्या आत जुगार खेळणारे आरोपी राम नगर पोलीसच्या ताब्यात चंद्रपुर: दिनांक 01/09/2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या रूममध्ये काही इसम हे 52 तारा पत्याचा पैस्याच्या हार जितीचा जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाली असता रामनगर पोलीसांनी पहिल्या मजल्यावरील 114 क्रमांकाच्या रूममध्ये पंचासह जावुन रेड केली आरोपी नामे 1) राजेन्द्र महादेव नाईक वय 60 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. छत्रपती नगर एम.ई.एल कॉलनी चंद्रपुर 2 ) लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरीअमवार वयं 68 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. सरकार नगर शिंदे मंगल कार्यालयाजवळ चंद्रपुर, 3) नरेश भगवान मुन वय 50 वर्ष, धंदा मजुरी, रा. मेजरगेट दुर्गापुर रोड चंद्रपुर 4) यशवंत हिरामन रत्नपारखी वय 66 वर्ष, धंदा सेवानिवृत्त रा. तुकुम वार्ड क्रमांक 2 चंद्रपुर 5 ) विलास सदाशिव खडसे वय 52 वर्ष, धंदा नौकरी, रा. लक्ष्मीनगर तुकुम चंद्रपुर, 6) मयुर भाग्यवान गेडाम वय 38 वर्ष, धंदा गाडी खरेदी विक्री, रा. संजयनगर मुल रोड चंद्रपुर 7) शामराव हिरामन मस्कर वय 65 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, बाबटनगर गजानन मंदीरजवळ चंद्रपुर 8 ) अजय मधुकर वरकड वय 54 वर्ष, धा नौकरी, रा. गुरूदवारा रोड वियर कॉलनी चंद्रपुर १) अंकित गजानन निलावार वय 27 वर्ष, मुसळे हॉस्पीटल जवळ चंद्रपुर हे गोलाकर एका टेबलांसभोवताल बसुन रूममधिल लाईटच्या उजेडात 52 तास पत्याचा पैस्याचे हारजितचा जुगार खेळतांना मिळुन आले तसेच आरोपीताकडुन अंगझडतीतील व एकुन मोबाईल कि. 4,35,960/- रू. व डावावरू 5000/-रू. व 52 तास पत्ते कि.अं. 100/- रू. आरोपीचे एकुन मो.सा. व चार चाकी वाहण कि. 14,00,000/- रू. असा एकुण 18,40,100/-रू.चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 4, 5 म.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन, मा.अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू , मा.उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख , रामनगर गुन्हे शोध पथकाने केली आहे.