शालेय मुलींच्या सुरक्षितते करीता प्रिदर्शनी कन्या विद्यालय व जनता विद्यालयात सि. सि. टी. व्ही कॅमेरे लावा तथा सुरक्षा योजना राबवा
यास्मिन सैय्यद काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बलात्काराच्या घटनेला महापूर आलेला आहे. बल्लारपूर, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, दुर्गापूर, चंद्रपूर येथे बलात्काराच्या व विनयभंगाच्या घटना घडल्या यात मानसिक रुग्ण महिला व आठ वर्षीय मुलींचा समावेश आहे. बल्लारपूर येथे सतरा वर्षीय नाबालिग युवती वर चार लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याने सदर मुलीने आत्महत्या केल्याची अंत्यन्त क्लेशदायक घटना घडली आहे. सदर घटनाची घुग्घूस शहरात पुनरवृत्ती होऊ नये मुलींच्या सुरक्षिततेला धोखा निर्माण होऊ नये याकरिता महिला काँग्रेसने शहरातील प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा जनता विद्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली व मुख्यध्यापकांची भेट घेऊन विद्यार्थिनीच्या सुरक्षा व शाळेत संपूर्ण ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे.
शहरातील प्रियदर्शनी कन्या विद्यालयात मोठ्या संख्येने मुली शिक्षण घेण्यासाठी जातात या शाळेच्या मागे झाड – झूडपे असून याठिकाणी शहरातील टवाळखोर मुलं ये – जा करीत असल्याचे यामुळे मुलींच्या सुरक्षिततेला धोखा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत तसेच जनता विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीना ही शाळे बाहेरच्या मुलांचा त्रास होत असल्याची अनेक तक्रारी पालकांनी केल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने दोन्ही शाळेच्या मुख्यध्यापकांची भेट घेत मुलींच्या सुरक्षितते करीता अंमलबजावणी करण्याचे तसेच शाळेच्या वर्ग खोली शौचालया समोर तसेच शाळेच्या समोरील व मागील भागात सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली
याप्रसंगी नीलिमा वाघमारे, मिरा माणुसमारे, नंदाबाई आत्राम, अश्विनी धुर्वे, मीना कार्लेकर, अनुसया ताई नन्नावरे, वंदना ताई व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते