घुग्घूस : शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा जनता दरबार आयोजित केला होता. सदर जनता दरबाराला शहरातील सर्वच वॉर्डातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या समस्या मांडल्या यात प्रामुख्याने अमराई भुसखलन, नगरपरिषद समावेशन, लोखंडी पूल, उड्डाणपूल, शासकीय जागेवरील अतिक्रमण, प्रयास सभागृह, लॉयड्स मेटल्स, वेकोली, तहसील कार्यलय, वैद्यकीय मदत, शेतकऱ्याशी संबधित मागण्या, रोजगार अश्या विविध समस्या प्रामुख्याने होत्या भेटीला आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या आस्थेने ऐकून घेतल्या व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या व नागरिकांना त्यांच्या समस्या निवारणाचे आश्वासन दिले. खासदारांचा मनमोकळा स्वभाव व साधेपणाने उपस्थित्यांचे मन जिंकली.
याप्रसंगी काँग्रेस नेते किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार, एस सी सेल माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर,सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,अलीम शेख,अनिरुद्ध आवळे, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,मोसीम शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, सुजाता सोनटक्के, माधुरी सुटे, पूनम कांबळे, सरस्वती पाटील, पुष्पा नक्षीने, प्रीती तामगाडगे, वैशाली दुर्योधन, विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, थामस अर्नाकोडा, शेख शमिउद्दीन,कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, दिपक कांबळे, शंहशाह शेख, कपिल गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते