पत्रकार परिषद घेऊन चंद्रपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव भुमीपुत परिवर्तन शक्तीने केले आव्हान

22

पत्रकार परिषद घेऊन चंद्रपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव भुमीपुत परिवर्तन शक्तीने केले आव्हान


चंद्रपुर  :
सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, शिवरत्न सेना जिल्हा चंद्रपूर या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, प्रदीप उमरे संस्थापक अध्यक्ष शिवरत्न सेनेचा वतीने येत्या 2024 रोजीचा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 या क्षेत्रामध्ये उमेदवारी लढविण्याचे ठरविले आहे. या दोन्ही संघटनेचा माध्यमातून एक नवीन आघाडी निर्माण केली आहे. त्या आघाडी खालील प्रमाणे नाव दिले आहे.

” भुमीपुत्र परिवर्तन शक्ती जिल्हा चंद्रपूर”

या आघाडी माध्यमातून चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत उभे केले असलेले अधिकृत उमेदवार
“सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव”
हे या आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे. असे आज जाहीरपणे सर्वानुमते आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी नाव घोषित केले.

भुमीपुत्र परिवर्तन शक्ती ला परिपूर्ण सुरेश मल्हारी पाईकराव यांच्यावर विश्वास आहे. ज्या प्रकारे त्यांनी जी समाजिक भुमिका बजावली आहे. मग ती ACC सिमेंट कंपनी असो किंवा WCL असो कुठल्याही प्रकारचे कामगारांचे प्रश्न हे सुरेशभाऊ सोडवितात. आज भाऊ कडे कुठल्याही प्रकारचे पद नसुन ते शासन प्रशासन यांना त्यांचा जाब विचारतात तर मग आपण सर्व चंद्रपूर विधानसभेतील नागरिकांनी जर सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांना या चंद्रपूर विधानसभेत जर एक संधी देवून येत्या विधानसभेत बहुमताने निवडून दिल्यास आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा आमचा सुरेशभाऊ पाईकराव वर विश्वास आहे .

सुरेशभाऊ पाईकराव जर निवडुण आले तर लोकांचा हितासाठी गोरगरीब गरजु नागरिक आहे. त्याच्यासाठी त्यांनी म्हटले की शासन नियमानुसार फक्त त्यांचाच अधिकार त्यांना द्या . बाकी काही नको. सुरेशभाऊ पाईकराव यांनी एकाच शब्दात शासनावर वार केला.

जर सुरेश पाईकराव आमदार झाले तर काय महत्वाचे कार्य करणार

1) चंद्रपूर विधानसभात मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे आणि चंद्रपूर विधानसभा मध्ये अनेक कारखाने
आहेत. या कारखान्यात कंपन्यामध्ये बेरोजगारांना पर्मनंट /स्थायी रोजगार मिळवुन देणार तसेच दहा ते पंधरा वर्षांपासून ज्या कारखान्यात कामगार काम करत आहे त्यांना त्यात कंपनीमध्ये पर्मनंट स्थायी करणार .

2) ज्या गावांमध्ये कंपनी किंवा आस्थापना आहे. त्यांच्या हद्दीत येणारे सर्व गावातील बेरोजगार युवक /युवतीन , विधवा महिलांना, निराधार महिलांना, तलाक/ घटस्फोटित झालेल्या महिलांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सर्व कारखाना / कंपनीमध्ये ठेकेदारी पद्धत बंद करून पर्मनंट काम मिळवून देण्यास भाग पाडणार.

3) आज आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये शेती करणार्‍या शेतकरी बांधवांना कापुस व सोयाबीनला भाव मिळत नाही आहे. शेतकऱ्यांचा पिकांना भाव मिळाला पाहिजे अशी सुरेश पाईकराव भुमीका राखणार.

4) चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अनेक कारखाने आस्थापना आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षापासून कामगार काम करत आहे. कारखाना मालक / ठेकेदारा मार्फत त्यांना बरोबर पगार दिला जात नाही. त्यांचा PF, ESIC, HRA, BONUS व अन्य सोयीसुविधा दिल्या जात नाहीत.
शासन निर्णयानुसार किमान वेतन विशेष भत्तासह व अन्य सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने मालक / ठेकेदार वर्गाकडून कामगारांची पिळवणूक होत आहे. वर्षानुवर्षे काम करूनही कामगारांसाठी असलेल्या कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाही. जर सुरेश पाईकराव आमदार झाले तर त्यांना नोकरीत पर्मनंट स्थायी करणार व ठेकेदारी पद्धतच बंद करणार.

5) आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आहेत. अनेक आस्थापना आहेत या कंपनीचे नाहक प्रदूषण आपण सहन करित आहोत. कंपनी /आस्थापना यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी कारखाना मालकांना बजावणार. तसेच गोरगरीब गरजु विद्यार्थी /विद्यार्थीनी ज्यांचे पालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने जे पालक आपल्या पाल्याला उच्च शिक्षण देऊ शकत नाही.अशा पाल्यांना / विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण अंग्रजी मिडियम (CBSE, ICSE ) यांच्या सर्व खर्च या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कंपनीला उचलायची जबाबदारी देणार आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात असे अमलबजावणी करणार .

6) चंद्रपूर जिल्ह्य़ातील घरगुती काम करणाऱ्या रोजंदारी महिलांना स्वतःचा निवारा नसल्याने महिणाला अखेरी कमी मिळकती मूळे घर भाडे चार ते पाच हजार रुपये देऊन त्रस्त आहे. हा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडविण्यासाठी अशा सर्व महिलांना त्यांचे स्वतःचे पक्के घर घरकुल योजनेंतर्गत बनवून देणार .

7) चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसर, वडगाव परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहा मागील परिसर, ब्लु लाईन मधील तेरा हजार (13000 ) घरे उठवणार आहेत. त्यातील एकही घरे उठुवु देणार नाही त्यावर योग्य उपाय योजना करणार.

एक संधी सुरेश मल्हारी पाईकराव यांना आपली सेवा करण्याची देण्यात यावी आपला आशिर्वाद आपली साथ सदैव माझी पाठीशी आहे. तशीच या निवडणुकीत सुध्दा राहावी. अशी अपेक्षा सुरेश पाईकराव यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांकडून केली.

तसेच सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, शिवरत्न सेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने भुमीपुत्र परिवर्तन शक्ती चा माध्यमातून आव्हान केले कि सम विचारिक पक्ष/संस्था आहे अशा संघटनेने आमच्या सोबत येवून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांचा , लोकहितासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी आपण एकमताने एकत्रित येऊन या हुकुमशाही ला आळा घालु असे आव्हान
सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, शिवरत्न सेनेचे अध्यक्ष प्रदीप उमरे, चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत वैध, सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर, वर्षाताई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर सुरेखाताई टिपले, रमाबाई सातारडे, रिताताई देशकर,शशिकलाबाई कासे, वैशालीताई निखाडे, सविताताई मंडपे, वैशालीताई कांबळे, विद्याताई दुबे, सुषमाताई धोटे, पिंकीताई तामगाडगे, पुनमताई कांबळे, आरती जैस्वाल, प्रज्ञाताई साव, बबीताताई दुर्योधन, कुमुदताई निखाडे, स्मिताताई कांबळे, वैशालीताई भालशंकर, मालाताई जिवने, प्रतिभाताई भगत, माधुरीताई चन्नुरवार, नैनाताई कन्नाके, सुषमाताई पाटील, संगीताताई गावंडे, अर्चनाताई कातकर, बिंदूताई कातकर, मायाताई उरकुडे,
अंजुताई नाहारकर, रंजनाताई राऊत, अनिता कामतवार,
तुळसाताई खंडाळकर, सारिकाताई आत्राम, अमित चौव्हान, दत्ता वाघमारे, बबन वाघमारे, विजय कवाडे, जगदीश मारबते, राकेश पराशिवे, यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here