भाजपा नेत्यांनी बळजबरीने पक्ष प्रवेश करवून घेतला : अजय त्रिवेण
देवराव भोंगळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश घेणाऱ्या अजय त्रिवेणी यांची घरवापसी
घुग्घूस : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फेसबुक वर सार्वजनिक रित्या पोस्ट करून पक्ष नेत्यांवर जाहीररित्या टीका करणाऱ्या अनुप भंडारी या कार्यकर्त्याला काँग्रेस नेत्यांनी कान पिचक्या दिल्या वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने यापुढे काँग्रेस पक्षात आपल्याला स्थान उरणार नाही याची जाणीव होताच अनुप भंडारी यांनी आपला जिवलग मित्र रफिक शेख व अजय त्रिवेणी या युवकांला सोबत घेऊन दिनांक 15 सप्टेंबर रोजी माजी जिल्हाध्यक्ष व राजुरा विधानसभा अध्यक्ष देवराव भोंगळे व जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला.
याप्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून भंडारी यांच्या सोबत भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या अजय सदानंद त्रिवेणी या युवकांने आज दिनांक 01 ऑक्टोबर रोजी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात घरवापसी केली.
आपण माइनिंग विद्यार्थी असून भंडारी हे माइनिंग सरदार पदावर वेकोलीत नोकरीवर लागले आहे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी आपण मित्रा सोबत गेलो असता मला बळजबरीने भाजपा कार्यलयात घेऊन गेले त्याठिकाणी उपस्थित भाजपा नेत्यांनी माझ्या इच्छे विरोधात माझ्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून माझा प्रवेश करून घेतला असा खळबळजनक व सनसनाटी आरोप त्रिवेणी यांनी लावला असून मी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे यापुढे मी काँग्रेस साठी कार्य करणार असल्याचा निर्धार त्रिवेणी यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर, सुनील पाटील, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.