घुग्घुस येथे प्रयास दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा संपन्न
युवती व महिलांची अलोट गर्दी
घुग्घुस : येथील प्रयास सभागृहात सोमवार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे प्रयास दांडिया उत्सव २०२४ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, लॉयड्स मेटल्स गोयंका शाळेच्या जेसी रॉय, अल्का पितरे, लॉईड इन्फिनिटी फाऊंडेन च्या प्रमुख नम्रपाली गोंडणे, संयोजीका अर्चना भोंगळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सरपंच संतोष नुने, संयोजक अमोल थेरे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, सिनू इसारप, चिन्नाजी नलभोगा, हसन शेख, गणेश कुटेमाटे, दिनेश बांगडे, विवेक तिवारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत ३७८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. युवती गट पुरस्कार प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१, तृतीय १००१ रुपये, महिला गट पुरस्कार प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१, तृतीय १००१ रुपये, प्रशिक्षणार्थी गट पुरस्कार प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१, तृतीय १००१ रुपये व ११ प्रोत्साहनपर पारितोषिके बक्षिसे ठेवण्यात आली होती.
विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून रोशन आवळे, वैशाली झाडे, अविनाश मेश्राम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजीका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, नितु चौधरी, सुचिता लुटे, वैशाली ढवस, पूजा दुर्गम, सुषमा सावे, नंदा कांबळे, सारिका भोंगळे, सिमा पारखी, सुनीता पाटील, नाजमा कुरेशी, विना वडस्कर, निशा उरकुडे, विना घोरपडे, वृंदा कोंगरे, वंदना मुळेवार यांनी प्रयत्न केले.