नवरात्रौत्सव सणादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पो.स्टे. बल्लारपुर. हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरुध्द भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई

24

नवरात्रौत्सव सणादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पो.स्टे. बल्लारपुर. हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरुध्द भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई


बल्लारपुर :
भयमुक्त वातावरणात नवरात्र उत्सव हर्षोउल्लासात साजरा व्हावा म्हणुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचेकडुन सर्व पोलीस स्टॉफला निर्देश प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे पथक पो.स्टे. बल्लारपुर परीसरात पेट्रोलिंग करीत असता, पथकास गोपनिय माहीती मिळाली की, आंबेडकर वार्ड बल्लारपुर येथील राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत उर्फ चिन्ना नरसिंग बोगावार वय 27 वर्षे हा त्याचे राहते घरी लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने लोखंडी धारदार तलवार बाळगुन आहे. अश्या माहीती वरुन स्थागुशा, चंद्रपुर पथकाने नमुद ईसमाचे राहत्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक लोखंडी धारदार पात्याची तलवार मिळुन आली.

आरोपी रोहीत उर्फ चिन्ना नरसिंग बोगावार वय 27 वर्षे रा. आंबेडकर वार्ड, चंद्रपुर यांचेविरुध्द पो.स्टे. बल्लारपुर येथे अप.क्र. 944/24 कलम 4,25 भाहका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोहवा धनराज करकाडे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे चापोहवा दिनेश बराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी यशस्वीरीत्या कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here