उसेगाव फाटा ते उसेगावापर्यत रस्त्याचे मजबुतीकरण सिमेंट कॉन्ट्रॅटीकरण पंधरा दिवसांचा आत करा अन्यथा आंदोलन करणार
सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर
चंद्रपुर ः 9 आक्टोंबर 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्रमांक 1 चंद्रपूर ला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. उसेगाव फाटा ते उसेगावापर्यत सिमेंट चे मजबुतीकरण रस्ता लवकरात लवकर बनविण्यात यावा यासाठी.
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सुध्दा सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर चा माध्यमातून निवेदनाद्वारे मागणी केली होती या मागणीला जवळपास एक वर्ष होत आले आहे. घुग्घुस / उसेगाव अंतर्गत महा मिनरल मायनिंग अँड. बेनिफीकेशन प्रा. लि. गुप्ता कोल वाशेरी जेव्हा बंद होती त्यावेळेस शेनगाव/ उसेगाव फाटा ते उसेगाव पर्यत रस्ता हा सुरळीत होता. जेव्हा पासून महामिनरल गुप्ता कोल वाशेरी सुरू झाली तेंव्हा पासून तर आज पर्यत रस्ता हा खुप मोठ्या खराब झालेले आहे. त्या रस्त्याने साधारण माणसाला ये – जा इतके त्रासदायक झाले आहे की. चारचाकी वाहन तर दुर बैलगाडी, दोन चाकी गाडी सुध्दा त्या रस्त्याने ये – जा करण्या जोगता राहिला नाही आहे. उसेगाव गावातील रहिवाशांन्या जर आपात्कालीन वेळेस जर या रस्ताने जायचे झाले तर रुग्णाचा त्याच जागीच जिव गमवावे लागतो अशी दशा या रस्त्याची झालेली आहे. . उसेगाव ते घुग्घुस यांचे अंतर पाच ते सहा किलोमीटर इतके आहे आणि घुग्घुस ते शेनगाव यांचे अंतर तिन किलोमीटर आहे. म्हणजे उसेगाव ते घुग्घुस शेनगाव फाटा जवळपास नऊ ते दहा किलोमीटर अंतर पडते. आणि उसेगाव ते शेनगाव फाटा हा तिन किलोमीटर अंतरावर पडते म्हणजे उसेगाव ते शेनगाव फाटा येथे लवकर येऊ शकतो. जर ह्या रस्त्याचे मजबुतीकरण लवकरात लवकर पूर्ण केली तर जने करून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहकत त्रास सहन करावा लागणार नाही. हा रस्ता गुप्ता कोल वाशेरी मुळे खराब झाला असुन या रस्त्याने ये-जा करते वेळेस कुणाचा अपघातात जिव गेला तर त्याचे जबाबदार कोण असा देखील प्रश्न पाईकराव यांनी निर्माण केला. सुरेश पाईकराव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली की पंधरा दिवसांच्या आत जर उसेगाव फाटा ते उसेगावापर्यत सिमेंट चे मजबुतीकरण रस्ता बनविण्यात यावा अन्यथा तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करु अशा देखील इशारा सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दिला.