रोशन दंतलवार यांची काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत लोकसभा समन्व्यक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने घुग्घूस सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार यांची चंद्रपूर काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतध्यक्ष नाना पटोले, सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार, सोशल मीडिया विदर्भ प्रभारी सुमित लोणारे, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने करण्यात आली.
दंतलवार यांच्या नियुक्तीमुळे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक माध्यमाच्या द्वारे पक्षाच्या प्रचाराला गती मिळणार आहेत
दंतलवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते शामराव बोबडे,सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,तालुका सचिव विशाल मादर, एन. एस. यु. आय. अध्यक्ष आकाश चिलका,अनिरुद्ध आवळे,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे, मोसीम शेख,विजय माटला,दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप, नुरूल सिद्दीकी,सुनील पाटील,अरविंद चहांदे,देव भंडारी,कपिल गोगला, दिपक कांबळे,सुकुमार गुंडेटी,संदीप कांबळे, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार, रंजित राखुंडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या