सारिपुत्त बुद्धविहाराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध- विवेक बोढे

20

सारिपुत्त बुद्धविहाराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्धविवेक बोढे


सारिपुत्त बुद्धविहारात हायमास्ट लाईटचे लोकार्पण


घुग्घुस : येथील सारिपुत्त बुद्धविहार (गांधीनगर व सुभाषनगर) येथे शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हायमास्ट लाईटचे लोकार्पण भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आले.

सारिपुत्त बुद्धविहार (गांधीनगर व सुभाषनगर) चा परिसर भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या पुढाकारातून लखलखणार आहे. सारिपुत्त बुद्धविहाराचे सौंदर्यीकरण व विविध विकासकामे करण्यासाठी सारिपुत्त बुद्धविहाराच्या महिला मंडळाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांना निवेदन दिले होते. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या पुढाकारातून
सारिपुत्त बुद्धविहार परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात आला.

शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह सारिपुत्त बुद्धविहाराला भेट दिली. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन केले. सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन विवेक बोढे यांचे स्वागत करण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, सारिपुत्त बुद्धविहाराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध आहे. मागील २० वर्षांपासून सारिपुत्त बुद्धविहाराच्या महिला मंडळाने बुद्धविहाराला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. सर्व धर्माची शिकवण माणसाने माणुसकीने वागले पाहिजे हिच आहे. भगवान बुद्धाची शिकवण अंगीकारली पाहिजे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मंडळाचे ऑडिट करून देण्यात आले आहे. सारिपुत्त बुद्धविहाराला निधी कमी पडू देणार नाही.

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि फीत कापून हायमास्ट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, विनोद चौधरी, अमोल थेरे, सिनू इसारप, बबलू सातपुते, पूजा दुर्गम, सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाच्या अध्यक्षा अल्का चुनारकर, उपाध्यक्षा अनिता कोल्हे, कोषाध्यक्षा सुमित्रा सोनटक्के, सहसचिव मंदाकिनी तेलसे, सदस्या शीला पडवेकर, मंजु निखाडे, चंदा जीवनकर, शकुंतला कांबळे, ज्योती रत्नपारखी, प्रज्ञा पडवेकर, नंदा नगराळे, भारती निमसटकर, आशु मजगवळी, संजय जिवनकर, आनंद निखाडे व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here