स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने महाकाली कॉलरीत खुन करणाराऱ्या तिन्ही आरोपीस अवघ्या दोन तासात केले अटक
चंद्रपुर –
दि. १५/१०/२०२४ रोजी महाकाली वार्ड चंद्रपूर येथिल नामे आर्यन वासुदेव आरेवार यास महाकाली वार्डातील काही लोकांनी संघनमत करून जुन्या वादावरून वैमनस्यातुन कट रचुन धारधार हत्याराने मारहान करून त्याचा खुन केला व घटनास्थळावरून मो.सा. ने पसार झाले अशी माहिती मा. पोनी महेश कोंडावार सा. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना प्राप्त होताच मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन तांत्रीक व कौशल्यपुर्ण तपास करून अवघ्या दोन तासातच सदर पळून गेलेल्या आरोपीस मो.सा. सह मौजा चुनाळा ता. राजूरा येथे पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीतांचे नाव १) अश्वीन उर्फ बंटी राजेश सलमवार वय २८ वर्षे रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर २) जॉन विलास बोलीवार वय १९ वर्षे रा. लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपूर ३) जसिम नसीम खान वय २४ वर्षे रा. जमनजटी दर्गा जवळ, चंद्रपूर असे असून तीन्ही आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने वर नमुद आरोपीस पुढिल तपासकामी पोस्टे चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी मा.श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पो.हवा. सुभाष गोहोकार ना.पो.कॉ संतोष येलपूलवार, पो.कॉ. गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, मिलींद जाभुळे, दिनेश अराडे यांनी केली.