HRG. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग
मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका
घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस आला असून ही कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत असून वेकोली याकंपनी समोर हतबल झाल्याचे ही दिसून येत आहे
पैंनगंगा मुंगोली कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर हच, आर. जि कंपनी ट्रॅक हायवा सारख्या मोठ्या वाहनाला रस्त्याच्या मधोमध उभे करून या वाहनात डिझेल ची रिफिलिंग करतात
सदर रिफलिंग वाहनातून रस्त्यावर इंधन रिफील करने हे अवैध आहे
याप्रकरणाची वेकोली तसेच जिल्हा प्रसासनाने तातळीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
हच. आर.जि हरीराम गोधरा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक क्र. RJ 21.GD 6010 वाहनामध्ये भर रस्त्यावर इंधन भरण्यात आले या ज्वलनशील पदार्थात आग लागून व वाहनाचा स्फ़ोट होऊन नागरिकांच्या जीवनाला धोखा होऊ शकते बंदी आहे
हरीराम गोधरा कंपनी प्रचंड वादग्रस्त असून या कंपनीच्या वाहनांतर्फे तसेच कंपनीच्या वाहनाचे सतत अपघात होत असतात यांचे नादूरुस्त वाहन ट्रक चार – चार दिवस लोटूनही रस्त्यावर उभे राहतात या उभ्या वाहणामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे
याकंपनीच्या वाहनाचे मेंटनस योग्य पद्धतीने होत नसल्याने कोळशाचे जड वाहतुकी मुख्यमार्गेवर प्रत्येक ठिकाणी चार चार दहा दहा दिवस उभे असतात इतर दुचाकी वाहनांना मोठा त्रास होते उभे असल्याचे ट्रकामुळे बिघडलेले नादुरुस्त वाहने उभे राहतात या अशा ट्रकावर कारवाई करावी अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे