पोलीसानी अवैध दारुसह 2 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त केला
वरोरा :
दि. ३१/१०/२०२४ रोजी उपविभागिय पोलीस अधिकारी, वरोरा मा. नयोमी अजिंक्य तांबडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉफ सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, पालीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, पोलीस अंमलदार महेश गावतुरे ब.नं. २३४६, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर ब.नं. ०१, पोलीस अंमलदार मनोज ठाकरे ब.नं. १३९९ यांनी मिळालेल्या गुप्त बातमी दारांचे खबरेवरुण मौजा मुरदगाव शेतशिवारातील बॉन्डे रा. नागपुर यांचे शेत जे प्रशांत झाडे रा. नागरी याने ठेक्याने केले आहे. त्या शेतातील बंड्यामध्ये देशी दारू साठवुन विकी करीत आहे. अश्या माहिती वरून, नमुद पोलीस स्टॉप यांनी सदर ठिकाणी जावुन, प्रोव्हीशन बाबत रेड केली असता, मुरदगाव शेत शिवारातील बोन्डें यांचे शेतातील बंड्या समोर एक टी. व्ही. एस. कंम्पनीची मोपेड गाडी क्र.MH-34-CH-7572 चे मध्यभागी पायदानावर देशी दारू ने भरलेले चार खरड्याचे खोके दिसुन आले. सदर ठिकाणी उभ्या असलेल्या इसमास नमुद पोलीसांची व पंचाची ओळख सांगुन, त्याचे नाव व पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव प्रशांत योगराज झाडे वय ३९ वर्ष रा. नागरी ता. वरोरा जि. चंद्रपुर असे सांगितले. परत त्याचे ठेक्याचे शेतातील बंड्यांची पाहणी केली असता, बंड्याच्या आतमध्ये ३५ नग खरड्याचे खोक्यात व त्याचे ताब्यातील मोपेड गाडी वरील ४ नग खरड्याचे खोक्यात असा एकुण ३९ नग खरड्याचे खोक्यामध्ये एकुण ३,९०० नग सिलबंद प्लास्टिक चापट शिश्या प्रत्यकी ९० मि.ली.ने भरलेल्या प्रत्येकी कि.४०/- रू. प्रमाणे एकुण कि, १,५६,०००/- रू. चा देशी दारूचा माल अवैद्रद्यरित्या विकी करण्याचे उद्देशाने, विना पास-परवाना बाळगुन मिळुन आला. तसेच टी. व्ही. एस. कंम्पनीची मोपेड गाडी क. MH-34-CH-7572 कि. १,२०,०००/- रू. असा एकुण २,७६,०००/- रू. चा माल मिळुन आला. सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन वरोरा येथे घेवुन आलो व त्यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे दारुबंदी कलमान्वये गुन्हा नोद केला. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक करीत आहे.