चंद्रपूर शहरात आरोपीकडुन एक देशी गावठी कटटा व जिवंत रांउड जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कार्यवाही

28
  1. चंद्रपूर शहरात आरोपीकडुन एक देशी गावठी कटटा व जिवंत रांउड जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कार्यवाही


आज दि.३१/१०/२०२४ विधानसभा निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, शुभम उर्फ खंजरभाई वासेकर, रा.महाकाली कॉलरी, चंद्रपूर याचेजवळ बंदुक आहे अशा माहितीवरून इसम नामे शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर, वय २२ वर्षे, धंदा मजुरी, रा. महाकाली कॉलरी, आनंदनगर, चंद्रपूर यास डब्लु.सी.एल एरिया रेती बंकर, बाबानगर बायपास रोड, चंद्रपूर येथे ताब्यात घेवुन त्यास अग्निशस्वाबाबत माहिती विचारली असता आरोपी शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर याने एक गावठी देशी कटटा कि १०,०००/- व एक जिवंत रांउड (बुलेट) अ.किं. २,०००/- रू एकुण १२,०००/- रू अशा वस्तु काढुन दिल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

नमुद आरोपीने विनापरवाना एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कटटा अग्निशस्त्र व एक पितळी धातुची जिवंत बुलेट (रांउड) दारूगोळा असा बाळगला असल्याने त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३.२५ अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला असुन सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here