त्या❗ माय माउलीच्या रुपाने अम्माचा आर्शिवाद मिळाला
चंद्रपूरचे : आमदार किशोर जोरगेवार मतदान करण्यासाठी पटेल हायस्कुल येथील मतदान केंद्रावर गेले असता मतदान करुन बाहेर निघताच एका माय माउलीने आवाज देत आमदार जोरगेवार यांना आर्शिवाद दिला. आज तुझ्या रुपाने अम्माने आर्शिवाद दिला असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.
आज विधानसभा निवडणकी साठी राज्यभरात मतदान होत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी गिरणार चौकातील पटेल हायस्कुल येथे सहपरिवार मतदान केले. मतदान करुन ते बाहेर पडताच एका वयोवृध्द महिलेने मागुन जोरगेवार यांना हाक दिली.आमदार जोरगेवार यांनीही थांबुन या माय माऊलीची विचारपुस केली. यावेळी या मातेने आमदार जोरगेवार यांना आर्शिवाद दिला.
दरवर्षी मतदान करतांना अम्मा सोबत रहायची, यंदा ती नाही. मात्र मतदान करतांना ती स्मरणात होती. अचाणक आज या मायमाऊलीच्या स्नेहात अम्माचे दर्शन झाले. जणू अम्मानेच मला आर्शिवाद दिला असल्याचे या प्रसंगा नंतर आमदार जोरगेवार म्हणाले.