माजी नायब तहसिलदार सुदर्शन तनगुलवार यांचे दु:खद निधन

24

जिवंत मनाचा माणूस हरपल

माजी नायब तहसिलदार सुदर्शन तनगुलवार यांचे दु:खद निधन

मुलीने दिला मुखाग्नि

भद्रावती, दि.०२ : येथील सुदर्शन तनगुलवार यांचे दि.०१ डिसेंबर ला सकाळी ०८.५३ वाजता ह्रदयविकाराच्या आजाराने चंद्रपूर येथील दवाखान्यात निधन झाले. ते मृत्युसमयी ६१ वर्षाचे होते.
सुदर्शन तनगुलवार हे नायब तहसिलदार पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे आयुष्य सामाजिक कार्यात घालवले. ते ग्राहक पंचायत, भद्रावती ते कोषाध्यक्ष होते. ग्राहक पंचायतच्या अनेक निर्णयात त्यांची अमूल्य कामगिरी होती.
गौरक्षण समितीमध्ये त्यांची अत्यंत महत्वाची भुमिका होती. नगरपरिषदेच्या कांजीतील १५ जनावरांचा लिलाव न करता त्यांना जैन मंदिर च्या गोशाळेला देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सर्व गोधन त्यांनी जैन मंदिर गौशाळेच्या सुपूर्द केले.
पतंजली योग समिती चे ते सक्रीय सदस्य असून त्यांनी अखेर पर्यंत चे दिवस समितीमध्ये घालवले. सेवानिवृत्त झाल्यानंतर शासकीय कार्यालयातील त्यांनी अनेक गरजू आणि शहरातील नागरिकांची रखडलेली कामे पूर्ण करून दिली. त्यामुळे समाजात त्यांचा मान होता.
त्यांना दोन मुली आहेत. मुलींवर त्यांना अभिमान होता. मुलींना चांगले शिक्षण दिले. मुला मुलीत त्यांनी कधी फरक केला नाही. त्यामुळेच त्यांचा अभिमान राखत त्यांना शेवटच्या क्षणी त्यांना त्यांचा लहान मुलीने मुखाग्नि दिली.
त्यांचा दि.०१ डिसेंबर ला पिंडोणी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी अखेरच्या दर्शनासाठी आप्त मंडळी, कुटुंम्ब आणि जनसागर लोटला होता. यावेळी त्यांच्या आठवणी ला उजाळा देत ग्राहक पंचायत चे सचिव प्रविण चिमुरकर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संचालक चंदूकाका गुंडावार, सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले, सेवानिवृत्त नायब तहसिलदार भांडारकर यांनी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली दिली. त्यांच्या परिवारास दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो अशी सर्वांनी प्रार्थना करून मौन व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here