हेल्पिंग हँड्स NGO च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन hu
भद्रावती: 6 डिसेंबर 2024 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 व्या महापरिनिर्वाण दिनी भद्रावती शहरांमधील स्थानिक NGO ‘हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती’ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बस स्टॉप, भद्रावती येथे “एक वही, एक पेन” हा उपक्रम राबवून बाबासाहेबांचा कार्यास आणि स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भद्रावती शहरांमधील जनतेनेही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व बऱ्याच वह्या आणि पेनी दान स्वरूपात स्वीकारण्यात आल्या. जमा झालेले वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गावाखेड्यात-घरोघरात पोहोचून वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमा मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत तर होणारच आहे शिवाय त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी व बाबासाहेबांसारखे विद्यार्थी तयार व्हावे, हा हेतू हेल्पिंग हँड्स NGO चा या उपक्रमामागे आहे. “एक वही एक पेन” या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स NGO भद्रावती मधील सतत योगदान व सहकार्य करणारे; सुकेशनी मानकर, सोनल उमाटे, प्राची वेल्हेकार, कृतांत साहारे, सागर निरंजने, अनिकेत बांबोडे, रीता सहारे, स्नेहा सातपुते, राजरत्न पेटकर, वैभव रामटेके, मनोज पेटकर, वैभव मानकर, तुषार दुर्गे, प्रणय कांबळे, वैभव पाटील, पंकज शेंडे, आदर्श मेश्राम, भाग्यश्री शेंडे, सोनू सिंग, संकेत चीमुरकर, स्वप्निल बनकर, प्रशांत सातपुते, हर्षदा हिरादेवे, दीपक कावटे, जया सपाटे, पवन दासलवार, स्वप्निल मत्ते, अंकित तोडे, कैश शेख, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर, आशिष मल्लेलवार व इतर सर्वांनी मोलाचे योगदान दिले.