भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली

16

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली


घुग्घुस -दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 वा महापरिनिर्वाण दिना निमित्त पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे मानवंदना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,
प्रमुख पाहुणे दिनेश वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना व आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी 11 वाजता नगर परिषद घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना व भीम स्तुती घेऊन नगर परिषद घुग्घुस येथे आदरांजली वाहण्यात आली नंतर पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, प्रमुख पाहुणे दिनेश वाघमारे सर
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे, सल्लागार संभाजी पाटील, सोहम पाटील, समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनीताई सातपुते, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, सचिव स्मिताताई कांबळे, कोषाध्यक्ष रमाबाई सातारडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पंचशील बौद्ध विहाराचे नवनिर्मित बांधकाम सुरू असल्याने ह्या बांधकामचे कार्य लोक वर्गणीतुन करण्यात येत आहे. या विहार बांधकामाला कुठलाही शासकीय, कोणत्याही कंपनीतर्फे फंड किंवा पैसा नघेता ह्या विहारचे बांधकाम लोक वर्गणीतुन करण्याचे सुरू आहे.
हे काम बघता दिनेश वाघमारे सरानी हे कार्य खुप छान आणि स्वाभिमानाचे आहे या कार्याला माझा सुध्दा वाटा असला पाहिजे यासाठी त्यांनी विहार बांधकामाला अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे, वैशालीताई निखाडे, रिताताई देशकर, प्रतीमाताई कांबळे, स्मिताताई कांबळे रमाबाई सातारडे
यांना विहार बांधकामास दहा हजार रुपये दान देण्यात आले.
अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी वाघमारे सरांचे धन्यवाद मानले.
या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळ उपाध्यक्षा प्रतिमाताई कांबळे तर आभार प्रदर्शन सुषमाताई धोटे यांनी केले.
लोकांना स्टेज डेरिंग यावी यासाठी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी नवीन नवीन पुरुष महिला संचालक व आभार प्रदर्शन करावे यासाठीही सुध्दा पाईकरावनी संकल्पना आखलेली आहे.
सायंकाळी घुग्घुस येथील सर्व बौद्ध विहारातील रॅली पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे एकत्रित येऊन गांधी चौक, बँक ऑफ इंडिया, मार्गानी कॅडल मार्च रॅली जात अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे असे घोषणा करित समारोपीय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे मानवंदना आदरांजली वाहण्यात आली. सामुहिक बुध्द वंदना भीम स्तुती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा उपाध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, दिगांबर बुरड, जनार्दन जिवने, अनिरुद्ध आवळे, जयंत निखाडे, रवी देशकर, बबन वाघमारे, विजय कवाडे, प्रविण कांबळे, मधुकांत पाटील, सुनिताताई भगत, गुड्डी पोपटकर, वनिताताई निखाडे, पार्वताताई वानखेडे, मीनाताई गुडदे, भावनाताई कांबळे,
प्रतीभाताई सोंडुले, व समस्त घुग्घुस येथील बौद्ध बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here