भंडारा जिल्हातून उत्कृष्ट कवयित्री म्हणून हर्षा भुरे सन्मानित.
श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिति नागपुरच्वा वतीने पारीतोषिक प्रदान करण्यात आले
भंडारा: श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती नागपूर वतीने “जय गजानन काव्यानंद स्पर्धा २०२४”या भक्तिमय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन कविताना रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र तसेच दोन कविताना प्रोत्साहन पारितोषिक प्रदान याशिवाय प्रत्येक जिल्हातून एका उत्कृष्ट कवितेला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले होते.
कवयित्री हर्षा भुरे यांनी भंडारा जिल्हातून प्रथम पारितोषिक मिळविले त्याबद्दल आयोजकांनी भंडारा जिल्हातून उत्कृष्ट कवयित्री म्हणून यांना सन्मानित करण्यात आले होते. कवयित्री हर्षा भुरे कवयित्री असून उत्कृष्ट रांगोळीकार, उत्कृष्ट संस्थापिका आणि लाडू काव्य निर्माती आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.