- एआयएमआयएम पक्षातर्फे ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे स्वागत
घुग्घुस येथील एआयएमआयएम पक्षातर्फे नवनियुक्त ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे स्वागत करण्यात आले.
नुकताच नवनियुक्त ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी घुग्घुस ठाण्याचा पदभार सांभाळाला आहे.
त्याअनुषंगाने एआयएमआयएम पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणेदार श्याम सोनटक्के यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी घुग्घुसचे शहराध्यक्ष सानू सिद्दीकी, जिल्हा महासचिव विनेश कलवल, युवा अध्यक्ष सोहेल शेख, शकील शेख, हसनैन सिद्दीकी आदी उपस्थित होते.