- पांढरकवळा येथे पंचमुखी हनुमान मंदीर भक्तनिवास भुमिपुजन
- घुग्घुस
- चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा येथील जागृत पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानाकरीता भक्त निवास बांधकाम करण्यासाठी आमचे नेते, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रुपये १५० लक्षांचा विकासनिधी मंजूर केला; त्या कामाचे आज ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सुचनेनुसार भुमिपुजन केले.
लोकनेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालीत, न भुतो असा विकासनिधी जिल्ह्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आदरणीय सुधीरभाऊंची सातत्याने धडपड असते. याठिकाणी हनुमान मंदिराच्या सेवेत भक्तनिवास उभे झाल्याने येणाऱ्या भाविकभक्तांना अतिशय सोयीचे होईल, त्या दृष्टीने याठिकाणी उत्तम भक्तनिवासाचे बांधकाम व्हावे, अशी भावना याठिकाणी बोलतांना व्यक्त केली.
यावेळी माझ्यासमवेत जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, धानोरा सरपंच विजय आगरे, विनोद खेवले, धनराज कोवे, सौ. नितू चौधरी, श्यामकांत थेरे यांचेसह आदी मंडळी आवर्जून उपस्थित होते.