- गौवंश तश्करी करणाऱ्या दोन आरोपीसह 30 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त
-
वरोरा पोलीसची मोठी कारवाई
वरोरा : पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. ०८/०३/२४ रोजी गोपनीय माहीतीगार याचेकडुन माहीती मिळाली की, ट्रक क्र.एम.एच.३२ ए.के.५७८६ मध्ये अवैध गोवंश तस्करी करूण नागपूर कडून हैद्राबाद कडे जाणार आहे.
या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप यांनी रत्नमाला चौक वरोरा येथे सापळा रचुन ट्रक क्र.एम.एच.३२ए.के.५७८६ ला थांबवून झडती घेतली असता ५३ नग बैल कीमत अंदाजीत १०,६०,००० रू व ट्रक असा एकून ३०,६०,००० रू चा मुददेमाल ट्रक चालक झनकलाल मरकाम रा. मध्यप्रदेश व धिरज रेडडी रा. नागपूर यांचेवर कार्यवाही केली.
सदरची कारवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, पोलीस अधिक्षक नाओमी साटम उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्र सिंग यादव, पोहवा दिलीप सुर, दिपक दुधे यांनी पार पाडली.