भद्रावती तालुका जिल्हा चंद्रपूर.द्वारा CSR activities फंड चा गाव विकासासाठी खर्च दाखवून स्थानिक लोकांचे व शासनाची फसवणूक.
भद्रावती: कर्नाटक पावर कारपोरेशन लिमिटेड एम्टा बरांज कोळसा खाण प्रकल्प तालुका भद्रावती,जिल्हा चंद्रपूर द्वारा, वर्ष 2006-07 पासून मागिल 17 वर्षांपासून ह्या खाणी मधून करोडोचा उत्पादन करत, CSR activities फंड मधून अद्याप कोणत्याही प्रकारची खर्च केल्याचे दिसून येत नाही. कंपनीने वर्ष 2013 मध्ये 1153 लाख रुपये CSR फंड गावातील विकासकामे साठी खर्च करण्याची तरतूद ठेवले होते. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाही. तसेच मागिल आर्थिक वर्षात 81,20,000 रुपयांची CSR activities फंड मधून खर्च केल्याचे खोटे अहवाल शासनाला सादर केला आहे . कंपनी द्वारा बनावट व बोगस अहवाल दाखवून पर्यावरण तसेच कार्पोरेट मंत्रालय चे नियमांचे उल्लंघन करत, स्थानिक लोकांचे फसवणूक केली आहे. ह्या फसवणूक प्रकरणी अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा मिनिस्ट्री आफ कार्पोरेट अपेअरस मंत्रालय ला ह्या कंपनी चे विरूद्ध तक्रार दाखल करून, ह्या विषयावर यथाशीघ्र मौकाचौकशी करून,ह्या कंपनी ला मिळाले ली उद्योग लाइसंस रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच बनावट अहवाल सादर करून पर्यावरण तसेच कार्पोरेट अपेअरस मंत्रालय व स्थानिक लोकांना फसवणूक प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ही केली आहे, असे अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे.
घोटाळा! घोटाळा! कर्नाटक पावर कारपोरेशन लिमिटेड (एम्टा), बरांज कोळसा खाण
भद्रावती तालुका जिल्हा चंद्रपूर.द्वारा CSR activities फंड चा गाव विकासासाठी खर्च दाखवून स्थानिक लोकांचे व शासनाची फसवणूक.