कोळश्यात मिळविला जात आहे कंपनीतुन निघणारा काळा पावडर युक्त धूळ
घुग्घूस : औद्योगिक शहर येथील काळ्या कोळश्या करीता सर्वदूर प्रसिद्ध आहे या कोळश्याच्या अवैध तस्करीमुळे कधी काळी या शहरात अनेक माफिया निर्माण झाले अनेकदा टोळी युद्ध झाले मात्र बदलत्या काळानुरूप कोळसा तस्कर ही आता स्मार्ट झाले असून कोळसा तस्करीचा प्रकार ही बदलला गेला आहे.
घुग्घूस शहरा लगतच्या मातारदेवी मुर्सा याठिकाणी फ्युलको या खाजगी रेल्वे सायडिंगचा शुक्रवार दिनांक 30 मे रोजी विधिवत पूजा करून पहिली कोळसा भरलेली रॅक पाठविण्यात आली.
आणि येथूनच एका मोठ्या अश्या भ्रष्टाचाराला सुरुवात झालेली आहे या भ्रष्टाचारात मोठं – मोठया राजकीय व्यक्तीचा सहभाग असल्यामुळे सध्या शासनाचा याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
असा चालतो काळ्या कोळश्याचा काळा खेळ?
परिसरातील अनेक कोलवाशरीज या महा औष्णिक विद्युत केंद्राला व अन्य ठिकाणी कोळसा पुरवठा करतात याच काम असतो कोळसा व्यवस्थितरित्या स्वच्छ करून पुढे पाठविणे प्रत्यक्ष कोळश्याशी यांचा संबंध नसतो मात्र अधिकाऱ्यांच्या साठी – गाठीने व आर्थिक देवाण – घेवाणीतून नियोजनबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो लॉयड्स व अन्य कंपनीतुन काळा धूळयुक्त चारकोल विकत घेतल्या जातो याला या सायडिंगवर आणून कोळश्यात मिळविला जातो. व चांगल्या प्रतीचा कोळसा खुल्या बाजारात विकल्या जातो घुग्घूस चंद्रपूर मार्गांवर अनेक कोलश्याचे कोल डेपो आहेत याठिकाणावरून हा खेळ चालतो
शेतकरी व नागरिक त्रस्त
मातारदेवी मुर्सा परिसरात फ्युएलको कंपनीच्या वतीने कोळश्याची मोठी साठवणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये पावडर सारखा चारकोलचा धूळ मिळविण्यात येत असल्यामुळे हा धूळ सर्वत्र पसरतो यामुळे शेतकऱ्यांचे शेतमाल पूर्णपणे उध्वस्त होते शेत जमिनी या नापिक पडतात या धुळामुळे परिसरातील नागरिकांना दमा श्वसनाचा त्रास त्वचारोग सह अनेक जीवघेणे आजार जडतात मात्र नागरिकांच्या समस्याकडे शासन लक्षच देत नसल्याने शेतकरी व नागरिक हतबल झाले आहेत शासनाचे डॊळे उघडतील काय? या भ्रष्टाचारावर कारवाई होईल काय? की नेहमी प्रमाणे मोठे मासे सुटतील या प्रश्नाचा उत्तर येणारा काळच देईल