-
घोटाळा! घोटाळा! घोटाळा! मुकुटबन डोलोमाइट खाणींच्या गलथान कारभारामुळे वन्यजीवांना धोका! कंपनी व वन अधिकारी च्या संगणमताने,जंगलामधील झाडांच्या शिरगणतीत घोटाळा?
नियमानुसार जुने गड्डे न भरता खाणकाम कसे सुरू?
अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा मागितलेल्या माहिती अंतर्गत घोटाळा चे सत्य उघड व तक्रार देऊनही वनविभाग चे अधिकारी कार्यवाही न करता, वनविभाग अधिकार्यांचे झोपेचे सोंग.
- झरी :-सिमेंट कंपनी मुकुटबन तालुका झरी, जिल्हा यवतमाळ,डोलोमाईट खाण पट्टा 572.17 हेक्टर क्षेत्र पैकी, यवतमाळ वनवृत्तातील पांढरकवडा वनविभागातील हिरापूर गोविंदपुर पिंप्रडवाडी या गावालगत चे C-26, C-27, C-33A मधील राखीव वनक्षेत्र (467.45 हेक्टर) च्या, राज्य वन्यजीव मंडळ चे अटि शर्ती मान्यता अनुसार, खाण प्रकल्पाचे क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गात येत असल्याने ह्या भागात खाणकाम सुरू करण्यापूर्वी, त्या आधी खणन केलेल्या खाजगी 104.72 हेक्टर क्षेत्र मधील खाणकाम गड्डे पुनर्भरण करून त्यावर वनाच्छादन करून, त्या नंतर वनक्षेत्रात खाणकाम करण्यासाठी अनुमती दिली आहे, मुकुट बन डोलोमाईट खाण क्षेत्र हे टिपलेश्वर वन्यजीव अभयारण्य -ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव अभयारण्य – कान्हारगाव वन्यजीव अभयारण्य चे सक्रिय भ्रमण मार्गात येतो. राज्य वन्यजीव संरक्षण समिती ने कंपनी ला खाणकाम चे जुने गड्डे पुनर्भरण करून वनाच्छादन करून खाणकाम चालू करण्यासाठी अनुमती दिली आहे,परंतु कंपनी ने हे जुने गड्डे पुनर्भरण करून त्यावर वनाच्छादन न करता जबरदस्ती ने मागिल पाच महिन्यांपासून खाणकाम सुरू केली आहे. वन अधिकारी मुकुट बन व पांढरकवडा ह्यांना सर्व माहिती असुन सुद्धा झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत. कंपनी ला एकूण वनक्षेत्र 467.45 हेक्टर क्षेत्र पैकी 413.45 हेक्टर क्षेत्र मध्ये खाणकाम अनुमती दिली आहे, ह्या वनक्षेत्रात वनविभाग ने 17,719 एवढे झाडं अहवालात दाखवून दिले आहे, परंतु प्रत्यक्षात ह्या वनक्षेत्रात लहान मोठे लाखोंच्या संख्येत झाड असल्याचे दिसून येते, ह्या अहवाल मध्ये दाखवून दिले ले झाडाचं संख्या व प्रत्यक्षात असलेल्या झाडाचं संख्या ह्या मध्ये भरपूर प्रमाणात घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. कंपनीने आतापर्यंत 413.45 हेक्टर पैकी अंदाज 40 हेक्टर मध्ये मागिल पाच महिन्यांपासून उत्खनन सुरू केली आहे, Rccpl सिमेंट कंपनी चे,परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर मधील खाणकाम, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व प्रकल्पग्रस्त ने बंद पाडल्या नंतर कंपनीने वन्यजीव संरक्षण समिती ने दिलेल्या अटी शर्ती चे पालन न करता जबरदस्ती उत्खनन सुरू केली आहे. ह्या वनक्षेत्रासाठी पैनगंगा नदी किनारी दुतर्फा 10 किमी दूर अंतरापर्यंत 3.49 लाख रुपये किंमतीची वृक्षारोपण करने सुद्धा नियमाने आवश्यक असताना कंपनीने ते सुद्धा न करता फक्त कागदोपत्री अहवाल सादर केला आहे. खाजगी जमीन मधील खाणकाम चे जुने गड्डे पुनर्भरण न करता खाणकाम चालू करून वाघ व इतर वन्यजीव व पाळीव ,मानवी जीवाला धोक्यात टाकण्याचा प्रयत्न कंपनी कडून सुरू आहे. व्याघ्र भ्रमण मार्गासाठी व वनक्षेत्रासाठी दुसरी खाजगी जमीन कंपनी ला खरेदी करण्यासाठी नियम अटी असताना अद्याप खाजगी जमीन खरेदी केली असल्याचे दिसून येत नाही.खाणीमधील जुने गड्डे पुनर्भरण करून त्यावर वनाच्छादन न करता, पैनगंगा नदी किनारी 3.49 लाखांची वृक्षारोपण न करता, व्याघ्र भ्रमण मार्गासाठी खाजगी जमीन खरेदी न करता कंपनीने जबरदस्ती ने खाणकाम चालू केले आहे, वनविभाग मुकुट बन व पांढरकवडा अधिकारी हयाच शहानिशा करून कंपनी वर कायदेशीर कारवाई न करता झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत. अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा वनविभाग मुकुट बन तसेच वनविभाग पांढरकवडा अधिकारी ना ह्या बाबतीत लेखी तक्रार दिली असताना, अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही होताना दिसत नाही,ह्या वनक्षेत्रात लाखोंच्या संख्येने झाड उपलब्ध असताना झाडांची संख्या अहवालात संख्या कमी दाखवून कंपनी व वन विभाग अधिकारी चे काय साटेलोटे आहे,हे वनविभाग तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकारी ने लवकरात लवकर तपासणी करून, कंपनी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावे. वन्यजीव संरक्षण समिती चे नियमांचे उल्लंघन प्रकरणी कंपनीचे खाणकाम तात्काळ बंद करून कंपनी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावे. ह्या विषयावर शासन व प्रशासन अधिकारी काय कायदेशीर कारवाई करतील ह्या कडे स्थानिक नागरिक व वन्यजीव प्रेमी चे लक्ष लागून आहे.असे अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी ह्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले आहे.