कार आणि बाईकचा अपघात
नितेश केराम
गडचांदूर राजुरा राष्ट्रीय महामार्गांवरील नाईकनगर गावाजवळ एका कार आणि बाईच्या अपघातात बाईकस्वार 2 तरुण गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे सदर घटना 3 जून मंगळवार रोजी सायंकाळी अंदाजे 7:30 च्या सुमारास घडली मृतक उमेश रामदास लेंघूरे वय वर्ष 41 मुलं तालुक्यातील चिरोली गावाच्या राहिवासी तर लंकेश कैलास मानकर वय वर्ष 37 हा काढोली खू येथील राहिवासी आहे
मिळालेल्या माहितीनुसार हें दोघेही गडचांदूरहून राजुराकडे वाईकने जात होते त्यावेळी एका भरधाव कार क्र MH /29/ BC O568 ने त्यांच्या बाईकला धडक दिली या धडकेत दोघेही जखमी झाले घटनेची माहिती मीळताच राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी पथकासह घटनास्थळी पोलोचले आणि जखमीना राजुरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले दरम्यान पुढील उपचारासाठी उमेशला नागपूरला नेत असतांना वाटेटच त्याचा मृत्यू झाला राजुरा पोलिसांनी कार चालकविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे