*महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी- सौ.उषाताई भोयर
*अंतरगाव येथील जागतिक महिला दिन साजरा.*
*अंतरगाव येथील महिला भगिनींतर्फे पाथरीचे मावळते पोलीस निरिक्षक मा.मंगेश मोहड यांचा जाहीर सत्कार*
*दिनांक :- ०८ मार्च २०२४*
*सावाली: – जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानार्थ जगात सर्वत्र साजरा केला जातो.अनेक कर्तृत्वान स्त्रियांनी आपल्या कार्यातून तसेच पुरुष्यांचा खांद्याला खांदा लावीत देशाचे नाव लौकिक केलेले आहे त्यांचा सन्मान व स्मरून करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांचा या दिवशी सत्कार केला जातो.त्याच निमित्याने मौजा.अंतरगाव येथे,पाथरीचे मावळते पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांचा निरोप समारंभ व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.*
*याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती,या सत्काराबद्दल सत्कारमुर्ती पोलीस निरीक्षक मा.मंगेश मोहड यांनी सर्व महिला भगिनी व आयोजकांचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पत्नी यशोधरा यांनी गौतम बुद्ध यांनी गृहत्याग केला तेवा त्यांनी जे धैर्य दाखवत कुटुंबाचा सांभाळ केला व नंतर पतीच्या मार्गांवर चालत त्यांनी सुद्धा गृहत्याग करीत संन्यास धारण केले त्यांचे हे त्याग जगाला आदर्श देणारे आहे एक स्त्री कश्याप्रकारे आपला परिवार व तसेच समाजात वावरात असते किती समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते राणी यशोधरा हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत, त्यांचा आदर्श सर्व महिलांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.*
*तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.उषाताई भोयर यांनी महिलांनी चुल आणी मूल पुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात प्रगती करावी,येत्या काळात महिला या अबला नवे तर सबला बनून जगासमोर या असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.जयश्री चेकबंडलवार यांनी केले.*