- अमराई येथील नाल्या दुरुस्ती करा व पथदिवे लावा : यास्मिन सैय्यद
नगरपरिषदेला निवेदनातून मागणी
घुग्घूस : येथील अमराई वॉर्डातील नाल्या हया घाणीने पूर्णपणे भरले असल्याने नागरिकांना विविध स्वरूपाचे आजार जडत असल्याने तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात विषारी सापाची संख्या वाढली असल्याने व पेट्रोल चोरांचा हैदोस वाढल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने जिल्हा महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेला शिष्टमंडळासह निवेदन देऊन गोपीनाथ मारेकर यांच्या घराजवळ दोन्ही बाजूने पथदिवे तसेच वैद्य यांच्या घरामागील नाली सह संपूर्ण अमराई परिसरातील नाल्या तातळीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे
याप्रसंगी कामीनाबाई वैद्य,कार्लेकर व आत्राम व अन्य जन उपस्थित होते