नितेश केराम
मागील अनेक वर्षांपासून सुलभ रस्ता नसल्याने पालगाव वासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासाठी गेल्या 5 मे रोजी नांदा येतील अल्ट्राटेक सिमेंट कपंनीच्या मेन गेट समोर राजुरा विधानसभेचे धडाकेबाज आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी 31 मे रोजी सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आवाहन कपंनी व्यवस्थापनाने दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
परंतु कपंनी प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही कपंनी प्रशासन जुमानत नसल्याने पालगाववासी आक्रमक होऊन पुन्हा एकदा 23 जून रोजी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात अल्ट्राटेक सिमेंट कपंनीच्या मेन गेट समोर आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
हेडलाईन संपली आता मागण्याची पूर्तता झाल्याशिवाय माघार नाहीच अशी भूमिका घेण्यात आली आहे.
सुवर्ण मोहत्सव साजरा करताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतरही पळगाव वासियांना व्यवस्थित रस्ता नसल्याने यांना नरकयातना भोगावी लागत असल्याचे चित्र आहे यासाठी मागील अडीच ते तीन वर्षात पालगाव वासियांनी अनेकदा कपंनी प्रशासनाला पत्र दिले चर्चा केली आंदोलन सुद्धा केले.
मात्र कपंनी केवळ वेळ मारून नेत असल्याचे करत असल्याने शेवटी आंदोलनाचे हत्यारे उपसण्यात आले
गेल्यावेळी आमदार भोंगळे यांनी स्वता गावकऱ्यासोबत उभे राहुन आंदोलन केले अखेर 3 दिवसानंतर कपंनी प्रशासन नरमले आणि 30 मे ला अल्ट्राटेक ते पालगाव असा रस्ता तयार करण्याचे पत्राद्रारे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र जून महिना संम्पत आला तरी कामाला सुरवात काही झालेली नाही अखेर संपत गाववशियांनी आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात पुन्हा आंदोलन सुरु केले आहेत विशेष म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट कपंनीच्या दत्तक गावात पालगावचाही समावेश असून जवळच कपंनीची खदान सुद्धा आहे.