हिरकणी महिला मंडळाची डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट व आर्थिक मदत
दिनांक ६ जुलै २०२५ रोज रविवारला हिरकणी महिला मंडळ, गाडगे बाबा चौक, नागिनबाग वॉर्ड, चंद्रपूर च्या वतीने डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा, चंद्रपूर येथे आषाडी एकादशी निमित्य भेट देण्यात आली. यावेळी सर्व वृद्धांनी आपला परिचय दिला. हिरकणी महिला मंडळाच्या सर्व महिलांनी सुद्धा आपला परिचय दिला. सर्व वृद्धांना खाऊचे वाटप करण्यात आले व डेबू सावली वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देण्यात आली. हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा रविंद्र चिलबुले व सचिव सौ. अश्लेषा रविंद्र मत्ते यांनी हिरकणी महिला मंडळा चे उद्दिष्ट व २०२० पासून आजपर्यंत वेगवेगळ्या संस्थांना दिलेली मदत या विषयी माहिती दिली. यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या सदस्या सौ. रेखा यादव सपाट, सौ. निशा नामदेव कन्नाके, सौ. तृप्ती मदन डोंगरे, सौ. स्वाती प्रमोद उके, श्रीमती अरुणा सुरेश आदे, सौ. सरिता अजय आदे, सौ. दुर्गा बाबाराव नैताम, सौ. लिना कार्तिक निकोडे, श्रीमती सुमन भोसकर, सौ. सविता रमेश चौधरी, सौ. निता संजय मत्ते, सौ. रोशनी अजय जाधव, सौ. रुपाली अनंता जाधव, सौ. रेखा ढोले, इत्यादी उपस्थित होत्या. शेवटी डेबू सावली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री. शिंदे यांनी वृद्धांची सेवा करण्याचे व्रत उचलल्या बद्दल त्यांचे व वृद्धाश्रमाच्या सर्व सभासदांचे हिरकणी महिला मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.