वणी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी संपास पाठींबा म्हणुन भरपावसात प्रचंड मोर्चा
वणी– आज केंद्रीय कामगार,कर्मचारी,श्रमीक संघटना व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने देशव्यापी संप पुकारला.या संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठींबा दिला.त्याअंतर्गत वणी येथील भाकपने राज्य कौंसिल सदस्य काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे व तालुकासचिव काॅ.मोरेश्वर कुटलवार यांचे नेत्रुत्वात भरपावसात प्रचंड मोर्चा काढुन आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना दिले.मोर्चात शेकडोंच्या संख्येत आशा,अंगणवाडी,शालेय पोषण कर्मचारी,आयटकचे कामगार,शेतकरी,शेतमजूर,व भाकपचे कार्यकर्ते सहभागी होते.