राजीव रतन चौकातील रस्त्यावरील खड्डे बुजविले

20

राजीव रतन चौकातील रस्त्यावरील खड्डे बुजविले



घुग्घुस: येथील राजीव रतन चौकातील रस्त्यावरील खड्डे घुग्घुस पोलिस ठाणे व लॉयड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून गुरुवार, १० जुलै रोजी बुजविण्यात आले.
सध्या पावसाळा सुरु असल्याने राजीव रतन चौकाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून पाणी साचून होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना, पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरीकांना नाहकत्रास सहन करावा लागत असे. ही समस्या लक्षात घेत घुग्घुस पोलिस ठाणे व लॉयड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून राजीव रतन चौकातील खड्डे जेसीबी मशीनद्वारे बुजविण्यात आले.
यावेळी ठाणेदार प्रकाश राऊत, वाहतूक शाखेचे विनोद लोखंडे, राहुल मसाडे, इस्माईल पठाण व लॉयड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here