कॅन्सर दवाखान्याचे लवकरात लवकर लोकार्पण करा.

19

कॅन्सर दवाखान्याचे लवकरात लवकर लोकार्पण करा.


चंद्रपुर : दिनांक 14 जुलै 2025 रोजी आजाद समाज पार्टी जिल्हा सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा प्रभारी चंद्रपूरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी ला मागणी करण्यात आली
चंद्रपूर जिल्ह्य़ातील कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण लवकरात लवकर करून सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली

, चंद्रपूर जिल्हा हा सर्वात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे असलेल्या कोळसा खाणी, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, सिमेंट उद्योग, पोलाद उद्योग हे उद्योग प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे राज्यात दुसऱ्या क्रमांकांच्या कर्करोग रुग्णांची संख्या म्हणून चंद्रपुर ओळखला जातो. या रुग्णांना अत्याधुनिक उपचाराच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये अग्रगण्य व नामांकित असलेल्या टाटा ट्रस्ट तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात आले आहे. ते लवकरच सुरू होणार होते मात्र त्यापूर्वी रुग्णांना सुविधा मिळावी, यासाठी किमोथेरपी केंद्र उघडण्यात आले आहे.जिल्ह्यात कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांचे निदान लवकर व्हावे, यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून किओसची एक टीम तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबीर भरवले जातात. रुग्णांची माहिती घेऊन त्यांची योग्य तपासणी केली जाते. या माध्यमातून कर्करोगाचे निदान करणे आता सोपे झाले. परंतु पुढील उपचारासाठी रुग्णांना नागपूर येथील रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी त्यांना मोठा खर्च मोजावा लागत असुन. आदिवासी, गरजू व गोरगरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सन 2023 रोजी सर्व अत्याधुनिक उपचाराच्या सोयीसुविधायुक्त कर्करोग रुग्णालयाचे होणार होते परंतू आजतागायत कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण झालेले नाही.
सामाजिक जबाबदारी म्हणून सुरेश मल्हारी पाईकराव आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. की, जिल्ह्य़ातील नागरिकांच्या हितासाठी कर्करोग रुग्णालयाचे लवकरात लवकर लोकार्पण व्हावे.
अन्यथा आम्हाला नागरिकांच्या हक्कासाठी आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल.
अशा देखील यावेळेस इशारा देण्यात आला.

यावेळेस आजाद समाज पार्टी जिल्हा महासचिव रिताताई देशकर, तालुकाध्यक्ष आकाश चिवंडे, प्रितीताई आवडे बबन वाघमारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here