जिल्हा बँकेवर पुन्हा काँग्रेसचाच अध्यक्ष विराजमान होणार जिल्हाध्यक्ष माजी आ सुभाष धोटेंचा दावा
नितेश केराम चंद्रपूर जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेची निवडनूक जवळपास 13 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लोकशाही पद्धतीने पार पडली या निवडणुकीत विविध पॅनल आघाडयांच्या माध्यमातून निवडणुका लढवले गेल्यात कोर्ट केसेस हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत वाऱ्या करण्यात आल्या अतिशय वेगवान घडामोडीनंतर बँकेची निवडनूक यशस्वीरित्या पार पडली सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये कोणताही पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात नाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक नवीन जुनी समीकरणे जुळवून संचालकांनी आपले विजय निश्चित केलेत यामध्ये एकूण 21 संचालकांपैकी काँग्रेस तथा महाविकास आघाडी समर्थीत 12 संचालक निवर्वाद निवडून आलेले असून या सर्व संचालकांना घेऊन काँग्रेसचे विधीमंडळ नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार खासदार प्रतिभा धानोरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असून यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेवर काँग्रेस आघाडीचा अध्यक्ष विराजमान होईल असा दावा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे जिल्हा बँकेवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्पित खासदार प्रतिभाताई धानोरकर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंग रावत शिवसेना उभाठाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे संदीप गडमवर विजयराव बावणे दिनेश चोखारे मोठघरे करपे आदी मान्यवर उपस्थित होते