राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करा!
काँग्रेसची महारेल अधिकाऱ्याशी बैठकीत मागणी
घुग्घूस : राजीव रतन उड्डाणपुलाच्या समस्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी महारेलचे उप – महाव्यवस्थापक (DGM) श्रीकांत गौड, सिनियर मॅनेजर प्रशांत लोकांडे यांच्याशी बैठक घेऊन पूल निर्माणातील समस्याची पूर्णपणे माहिती घेतली. व सदर पूल तातळीने निर्माण करण्यास सांगितले सदर पूल लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा ही दिला
चंद्रपूर ते वणी जाणाऱ्या महामार्गांवर घुग्घूस शहरातील राजीव रतन चौकात आर के मदानी कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या रेल्वे गेटवर दिवसात कमीत – कमी वीस ते पंचवीस वेळा रेल्वेगेट बंद पडतो या रेल्वेगेटच्या वाहतूक कोंडीत अनेक गर्भवती महिला व रुग्णाचा जीव गेला शहरातील वेकोली अंतर्गत येणाऱ्या अनेक कॉलनीतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,नोकरीदार लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहे.
हा एकेरी मार्ग असल्यामुळे या मार्गांवर प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होते कधी – कधी दोन – दोन तर कधी तीन – तीन तास वाहतूक जाम होत असते या मार्गांवर चालणे ही अशक्य आहे. या पुलाच्या निर्माणा करीता आजपर्यंत अनेक आंदोलन करण्यात आलेले आहेत.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, कपिल गोगला, विजय रेड्डी, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.