लॉयड इन्फिनाईट फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण
घुग्घूस : लॉयड मेटल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिनांक 21 जुलै 2025 रोजी घुग्घुस समूहातील पाचही शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार पाण्याची बॉटल, कंपास बॉक्स, नोटबुक व स्कूल बॅगचे वितरण सन्मा. प्रशांत पुरी साहेब, सन्मा. विद्या पाल मॅडम, सन्मा.अनिल दागमवार सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले . याप्रसंगी सन्मा. पुरी साहेब व विद्या पाल मॅडम यांनी यापुढेही असेच सहकार्य व योगदान दिले जाईल व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल दागमवार सर केंद्रप्रमुख घुग्घुस, संचालन पाझारे सर,आभार प्रदर्शन बारसागडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीएमश्री कन्या शाळा,घुग्घुस मुले व हिंदी शाळेच्या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.