अंगणवाडी तसेच बाल उद्यानाची समस्या सोडवा!
महिला काँग्रेसचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
घुग्घूस : शहरातील सुभाष नगर येथील क्रं.27 च्या अंगणवाडीतील बोरिंग गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे आंगनवाडीत येणाऱ्या लहान मुलांना पाण्याचा त्रास भोगावा लागतो तसेच अंगणवाडी परिसरात सर्वत्र झाड – झूडपे कचरा निर्माण झाला असल्यामुळे लहान मुलांना सर्प व विंचूची जीवघेणी भीती निर्माण झालेली आहेत.
तसेच चिल्ड्रेन पार्क या बाल उद्यानात ही सर्वत्र झाडं – झूडपे व घाण पसरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत
कृपया यागंभीर समस्याचे निवारण व्हावे याकरिता महिला काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देऊन समस्या तातळीने निकाली काढण्याची विनंती केली.
याप्रसंगी
झोया शेख, लक्ष्मी गोदारी, दुर्गम्मा आरापेल्ली, सुगना डोमा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते