दुचाकी पुलावर व्यक्ती बेपत्ता पैनगंगेत पोलिसांच रेस्क्यू ऑपरेशन
नितेश केराम कोरपना तालुक्यातील कोडशी खु येतील पैनगंगा नंदी पात्रात एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम बुधवारी (दि 23 जुलै मोट्या प्रमाणावर शोध मोहीम घेण्यात आली मात्र वृत्त लिहीपर्यंत संबंधित थांगपत्ता लागलेला नव्हता प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कोडशी खु येतील पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक दुचाकी वेवारस स्थितीत आढळून आली घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली घटनास्थळी कोरपना पोलीस दाखल झाले असून प्राथमिक चौकशीनंतर दुचाकी ही वनसडी येतील सतीश मारोती चिकराम यांची असल्याचे निष्पन्न झाले सदर दुचाकी पुलावरच उभी असून तिच्याजवळ अन्य कोणतेही सामान आढळले नाही या घटनेची गंभीर दाखल घेत चंद्रपूर येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून बुधवारी दिवसभर नदीपात्रात शोधकार्य राबविण्यात आले स्थानिक ग्रामस्थ पोलीस कर्मचारी व गोताखोरांच्या मदतीने पैनगंगा नदीच्या विस्तृत परिसरात शोध घेण्यात आला मात्र उशिरापर्यंत कुठलाही ठोस पुरावा किंवा वेक्ती मिळू शकलेली नाही सतीश मारोती चिकराम हें वनसडी गावातील राहिवासी असून मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यापासून त्यांचा काहीही थांगप्ता लागलेला नाही यामुळे परिसरात चिंतेच वातावरण आहे